जेवणापूर्वी,वॉशरुम मध्ये गेल्यावर व बाहेरुन घरी आल्यावर हात स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे.कारण हात स्वच्छ धुतल्यामुळे तुम्हाला कॉलरा,टायफॉइड,Gastroenteritis,सर्दी-खोकला,स्कीन इनफेक्शन सारखे विविध आजार टाळता येऊ शकतात.पण असे जरी असले तरी फक्त साबणाने हात धुणे पुरेसे नसून हात योग्य पद्धतीने धुणे अपेक्षित आहे.वर्ल्ड हेल्द ऑर्गेनायझेशनच्या सल्लानूसार तुम्ही पाणी व साबण याच्या सहाय्याने कमीतकमी ४० ते ६० सेंकद हात स्वच्छ धुवावेत.जर तुम्हाला हात नेमके स्वच्छ कसे धुवावेत हे जाणून घ्यायचे असेल तर हात स्वच्छ धुण्यासाठी व निरोगी जीवनशैलीसाठी या सात स्टेप्स जरुर करा. तसेच या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा.
स्टेप १-सर्वात आधी स्वच्छ पाण्याने तुमचे कोपरापर्यतचे हात ओले करा.त्यानंतर हातावर साबण अथवा हॅन्डवॉश घेऊन दोन्ही हाताचे तळवे एकमेंकांवर चांगले चोळून घ्या.
स्टेप २- आता दोन्ही तळहाताची मागील बाजू स्वच्छ करा.यासाठी डाव्या हाताने उजवा हात व उजव्या हाताने डावा हात वापरा.दोन्ही हातांच्या बोटांमधील जागा देखील साबण लावून चोळून घ्या.साबणाचा फेस येईपर्यंत असे पुन्हा पुन्हा करा ज्यामुळे तुमच्या बोटांमधील त्वचा देखील स्वच्छ होईल.
स्टेप ३-तळहात एकमेंकांना जोडा व बोटे एकमेंकांमध्ये अडकवा.तळहात व बोटे स्वच्छ करण्यासाठी दोन्ही हात एकमेंकावर घासा.
स्टेप ४- दोन्ही तळहात समोरासमोर घ्या व बोटे वाकवून एकमेंकांमध्ये अडकवा.हात स्वच्छ करण्यासाठी बोटे विरुद्ध दिशेने एकमेंकावर घासा.
स्टेप ५- एका हाताच्या बोटांनी दुस-या हाताचा अंगठा पकडा.आता तुमची बोटे त्या अंगठयाभोवती क्लॉकवाइज व अॅन्टीक्लॉकवाइज फिरवा.ही क्रिया दुस-या हाताच्या अंगठ्यासाठी देखील करा.
स्टेप ६-एका हाताची बोटे एकत्र करुन एखाद्या पुंजक्याप्रमाणे जवळ आणा.ही जवळ आणलेली बोटे दुस-या हाताच्या तळहातावर गोलाकार फिरवा.हिच क्रिया दुस-या हातासाठी देखील करा.
स्टेप ७-दोन्ही मनगटे विरुद्ध हाताच्या मदतीने क्लॉकवाइज व अॅन्टीक्लॉकवाइज घासून स्वच्छ करा.सर्वात शेवटी हात स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
हात स्वच्छ धुताना या टीप्स नेहमी लक्षात ठेवा.

- हात स्वच्छ केल्यावर नळ बंद करण्यासाठी नळाला हात न लावता टीश्यू पेपरचा वापर करा.
- धुतलेले हात स्वच्छ पुसण्यासाठी डिस्पोजेबल टीश्यू अथवा तुमच्या हातरुमालाचा वापर करा.
- वॉशरुममधील कॉमन टॉवेलला अथवा बाथरुमच्या डोअर हॅन्डलला हात लावू नका नाहीतर तुमचे हात पुन्हा खराब होतील. जाणून घ्या हॅन्ड सॅनिटाइजर वापरणे योग्य की अयोग्य ? निरोगी जीवनशैलीसाठी हात धुताना या स्टेप्स व टीप्स जरुर लक्षात ठेवा तसेच नियमित हात धुवा व आजारपणांना दूर ठेवा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock